(रत्नागिरी)
रत्नागिरी कोकणनगर फैजाने अत्तार येथे ग्यारवीं शरीफ सणानिमित्त आज इज्तिमाचे तसेच रॅली 05 ऑक्टोबर रोजी दुपारी 03 वाजता (जुलूस) चे आयोजन करण्यात आले आहे. सदर जुलूस (रॅली) उद्यमनगर ते कोकणनगर असा मार्ग असेल. ग्यारवी शरीफ हा इस्लामिक संत हजरत अब्दुल कादिर जिलानी यांच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक पवित्र दिवस आहे. जो दरवर्षी हिजरी कॅलेंडरनुसार ११ रबी-उल-अखिर रोजी असतो. हा दिवस ऐक्य, आशीर्वाद आणि धार्मिक भावना वाढवणारा मानला जातो.
ग्यारवी शरीफ म्हणजे काय?
हा एक पवित्र दिवस आहे जो ‘गौस-ए-आझम’, ‘पीरान-ए-पीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेख अब्दुल कादिर जिलानी यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हे इस्लामी कॅलेंडरमधील ‘११ रबी-उल-अखिर’ या दिवशी होते
जगभरातील सूफी मुस्लिम या दिवशी एकत्र येतात. प्रार्थना, फातिहा (पवित्र जेवण) आणि एकत्र जेवणाचे आयोजन केले जाते.
यामुळे ऐक्य आणि आशीर्वाद पसरवण्यास मदत होते असे मानले जाते. सदर इज्तिमा आज रात्री 9 वाजता सुरू होइल , इज्तिमा साठी सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे करण्यात आले आहे.

