(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बस स्थानकात एस.टी. बसच्या पुढील चाकाचा धक्का लागल्याने तरुणाच्या पायाला दुखापत झाल्याची घटना आज दुपारी पावणे एक सुमारास घडली.
मिळालेल्या माहिती नुसार कोल्हापूर डेपोची रत्नागिरी – कोल्हापूर एम एच १२झेड इ ८९५३ ही शिवाई गाडी साखरपा बस स्थानकावर फलटावर लावत असताना मोर्डे लाडवाडी येथील संजय रामचंद्र मांडवकर वय सु. ३८ याचा तोल गेल्याने एसटीच्या पुढील चाकाचा जोरदार धक्का लागल्याने पायाला गंभीर दुखापत झाली.
याबाबतची माहिती मिळताच सहाय्य्क पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पावसकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होऊन जखमीला सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोरे यांच्या मदतीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. मात्र अपघात कसा झाला याची शहानिशा साखरपा पोलीस करीत आहेत.


