(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील सदानंद चाळके यांच्या घरी गणपती सजावटीमध्ये साकारण्यात आलेला पंढरीच्या वारीचा देखावा आणि आकर्षक विद्युत रोषणाई भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
चाफवली गावातील प्रमुख घराणे असलेल्या सदानंद चाळके यांच्या घरी गणपती सजावटीमध्ये पंढरीच्या वारीचा मनमोहक देखावा साकारण्यात आला आहे. या सजावटीत भक्तीभाव जागवणारे विविध स्लोगनही देण्यात आले आहेत. गौराई, शंकर आणि गणपतीच्या आकर्षक सजावटीसोबतच पंढरीच्या वारीचे दृश्य भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘पंढरीची वारी जगात लय भारी’, ‘भक्ती देवळापर्यंत नेते’, ‘निष्ठा सेवा पर्यंत नेते’ अशा विविध भक्तीमय संदेशांचा सजावटीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गणपती सजावटीत पंढरीच्या वारीचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, विद्युत रोषणाई आणि देखाव्यामुळे ही सजावट विशेष आकर्षण ठरत आहे.


