(विल्ये / अमित कांबळे)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी उपकेंद्र येथे श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान २०२६’ अंतर्गत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ग्रामीण भागातील ६२ रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
शिबिरादरम्यान नागरिकांची वजन, उंची, रक्तदाब (बी.पी.), रक्तातील साखर (Blood Sugar) तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. नागरिकांसाठी गोल्डन कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय नियमित लसीकरण करण्यात आले. आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देतानाच नागरिकांना निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यिका सीमा पाडवी, समुदाय आरोग्य अधिकारी अक्षता नंदकुमार शिर्सेकर, आरोग्य सेविका डी. एस. गावडे, आरोग्य सेवक एस. एन. अंबुरे, आशा स्वयंसेविका साक्षी सुहास पवार, निशा मुकुंद वीर आणि मदतनीस नम्रता सिद्धार्थ पवार यांनी मेहनत घेतली. मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश डोके आणि आरोग्य सहाय्यक डॉ.परशुराम निवेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले.
मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश डोके यांनी कळझोंडी उपकेंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन शिबिराची पाहणी केली. शिबिर उत्तम प्रकारे पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश डोके यांचे कळझोंडी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी अक्षता नंदकुमार शिर्सेकर यांनी आभार मानले.


