(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जिंदल विद्या मंदिर प्रशालेच्या मुलींच्या फुटबॉल संघांनी शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत अंडर-१४ आणि अंडर-१९ या दोन्ही गटांत द्वितीय क्रमांक पटकावला.
१० सप्टेंबर २०२६ रोजी शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर, रत्नागिरीच्या अंडर-१४ आणि अंडर-१९ मुलींच्या संघांनी सहभाग घेतला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनिया सेठी यांनी सहभागी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक रणजित जाधव, मिथिला मोरे, आदित्य पवार आणि रोहित यांचे मार्गदर्शन लाभले.
अंडर-१९ मुलींच्या संघात रिद्धी पाटील, गार्गी घाणवटकर, भक्ती दुर्गवली, अस्मी हळदणकर, मृगजा हळदणकर, अक्षरा निकम, जुही गद्रे, अनन्या गद्रे, निधी गडदे, वैदेही दुर्गवली, मुग्धा घाडगे, अर्जया थोरात, हफसा मिरकर आणि अलीना मालदार यांचा सहभाग होता.
अंडर-१४ मुलींच्या संघात स्वरा राजवाडकर, श्री जोशी, वेदा खामकर, आराध्य महाडिक, ईश्वरी मेश्री, आरोही घोसाळी, ऋचा वझे, आर्या सावंत, आरुषी वेलणकर, अक्षरा आढाव, श्रीजा पाटील, रिमा सुर्वे, सारिया सय्यद, त्रिशा चौघुले, भूमी पाष्टे आणि तनिष्का खाडे आदी खेळाडूंचा सहभाग होता.


