(पुणे / वृत्तसंस्था)
पुण्यातील कात्रज परिसरात एका २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. माया रेड्डी असे मृत तरुणीचे नाव असून, ती भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. माया रेड्डी मूळची तेलंगणातील हैदराबाद येथील असून शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर कात्रज परिसरातील एका सोसायटीत राहत होती.
बुधवारी दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास माया रेड्डी हिने राहत्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून खाली उडी मारल्याची घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. माया रेड्डी हिने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. अभ्यासाचा ताण होता की यामागे अन्य काही कारण होते, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे भारती विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
माया रेड्डी आपल्या भावासोबत राहत होती. तिची परीक्षा सुरू होती आणि ती एमबीबीएसच्या सेकंड इयरमध्ये शिक्षण घेत होती. या घटनेबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी सांगितले की, ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जास्त रक्तस्राव झाल्याने माया रेड्डीचा जागीच मृत्यू झाला.
माया रेड्डी आणि तिचा भाऊ एकत्र राहत होते. ती एमबीबीएसच्या सेकंड इयरमध्ये शिक्षण घेत असून तिची परीक्षा सुरू होती. ती खूप तणावात असल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे तिच्या भावाने प्राथमिक तपासात पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
माया रेड्डी हिने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याचा अधिक शोध आता पोलीस घेत आहेत. तिच्यावर अभ्यासाचा किंवा परीक्षांचा काही मानसिक ताण (Mental Stress) होता का, की वैयक्तिक अथवा कौटुंबिक कारणांमुळे ती नैराश्यात होती, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. तिच्या मोबाईल फोनची तपासणी आणि मित्रांकडेही चौकशी केली जात आहे.


