(देवळे / प्रकाश चाळके)
महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या वतीने आज, सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच शेतकऱ्यांच्या हिताशी निगडित असलेल्या महासंघाच्या रास्त मागण्यांबाबत वरिष्ठ प्रशासन आणि संबंधित कार्यासनाने सकारात्मक निर्णय घेऊन त्या तातडीने मान्य कराव्यात, अशी ठाम मागणी महासंघाने केली आहे.
महासंघाच्या मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांबाबत वरिष्ठ प्रशासन व संबंधित कार्यासन असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल, असे महासंघाने म्हटले आहे. तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रशासकीय तसेच शेतकरीहिताच्या गैरसोयींसाठी संबंधित प्रशासन आणि कार्यासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
आज (७ सप्टेंबर २०२६) रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागातील आंदोलनकर्त्यांनी वरिष्ठ प्रशासन आणि संबंधित कार्यासनाने कृषी महासंघाच्या मागण्या मान्य करून सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, उद्याच्या आंदोलनातून तोडगा न निघाल्यास २१ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कृषी महासंघाने दिला आहे. त्यामुळे तोडगा न निघाल्यास वरिष्ठ प्रशासन आणि संबंधित कार्यासनाने शेतकऱ्यांची गैरसोय होईल अशा कामबंद आंदोलनाला मूक संमती दिल्याचा त्याचा मतितार्थ असेल, असेही महासंघाने म्हटले आहे.
शेतकरीहित, कर्मचारीहित आणि कृषी विभागाच्या सक्षम भविष्यासाठी शासनाने सकारात्मक व तातडीची भूमिका घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने केले आहे.


