(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज रत्नागिरी-चिपळूण एसटी बस आणि चिपळूणहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी मिनी बस (एस.टी. बस एम एच 20 बी एल 4038 व मिनीबस एम एच 08 एपी4527) यांच्यामध्ये कुरधुंडा ओझंरखोल येथे समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
दोन्ही बसमधील जखमींची प्राप्त झालेली नावे पुढीलप्रमाणे
1) विजय विश्वनाथ प्रसादे (60, रामपेठ, संगमेश्वर),
2) अजय रामदास भालेराव (40, एस. टी. चालक, सध्या चिपळूण, मूळ जळगाव ),
3) रघुनाथ दत्तात्रय फाटक (34, कसबा, संगमेश्वर),
4) अमृता श्रीकांत साठे (52, चिपळूण, एस. टी बस)
5) आहरत संतोष सावंत (15, पाली)
6) आण्णा बाबासाहेब पवार (33, पाली, मराठवाडी, रत्नागिरी)
7) सुशील धोंडीराम मोहिते (35, वांद्री, संगमेश्वर)
8) सविता धोंडीराम मोहिते (65, वांद्री, संगमेश्वर)
9) सहारा हमीद फकीर (22, शेट्येनगर, रत्नागिरी)
10) केतन श्रीकृष्ण पवार (34, कुवारबाव, जागुष्ट कॉलनी, रत्नागिरी)
11) शेखर सतीश साठे (32, डिप्लोमा फायरमन, रत्नागिरी)
12) सिद्धार्थ गोपाळ सावंत (74, पाली, वळके,रत्नागिरी )
13) अनिरुद्ध शिवाजी धनावडे (53, मारुती मंदिर, रत्नागिरी)
14) अंकिता अनंत जोगळे (40, माखजन, संगमेश्वर)
15) वैशाली सिद्धार्थ सावंत (60, पाली वळके)
16) उमर आफ्रिन मुलानी (25, कसबा, संगमेश्वर)

सदर अपघाताबाबत संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत. अपघातानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किशोर जोयशी, विनय मनवल, कोलगे, वांद्रे, खडपे वाहतूक शाखेचे पोलीस मुजावर, स्थानिक ग्रामस्थ आदींनी सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली.
घटनास्थळी अपघाताची तीव्रता पाहता बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले. जखमी प्रवाशांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिनी बसचा चालक अपघातानंतर गाडीच्या कॅबिनमध्ये अडकला होता. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे.
जखमींची अचूक संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. तसेच अपघाताचे नेमके कारणही समजू शकलेले नाही. मात्र येथे डायवर्शनचा अभाव असल्याने अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी होती. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.