(गुहागर / वार्ताहर)
घरातील कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडलेला ४५ वर्षीय प्रौढ बेपत्ता झाल्याची घटना गुहागर येथे घडली आहे. सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर त्यांच्या अपहरणाची तक्रार गुहागर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. महेंद्र बाळकृष्ण रहाटे (वय ४५, रा. छत्रपती शिवाजी चौक, गुहागर) असे बेपत्ता प्रौढाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या भावाचे मित्र सुधाकर मधुकर सांगळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, बुधवार, २ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास महेंद्र रहाटे घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले. त्यानंतर कुटुंबीय व परिचितांनी परिसरासह विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर रहाटे यांचा शोध लागत नसल्याने त्यांच्या अपहरणाची शक्यता व्यक्त करत गुहागर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलिस करीत आहेत.


