( संगमेश्वर / प्रतिनिधी )
समाज प्रबोधन शिक्षण संस्था, मुंबई संचलित डॉ. र. दि. गार्डी माध्यमिक विद्यालय, कळंबस्ते (वाडावेसराड, ता. संगमेश्वर) येथे मुख्याध्यापक प्रमोद दळी, सहायक शिक्षक अजित गोपाळ जाधव व शिक्षक दिलीप लक्ष्मण तांबे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सदिच्छा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष वि. ल . मोहिते यांनी भूषविले.समाज प्रबोधन शिक्षण संस्था व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करणेत आला होता.या समारंभात सेवापूर्ती होत असलेल्या शिक्षकांचा मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला तालुका व जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, माध्यमिक पतपेढीचे संचालक, पालक, माजी विद्यार्थी तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नातेवाईक, मित्रमंडळी, सरपंच व पंचायत समिती सदस्य यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
संस्थेच्या वतीने सरचिटणीस यशवंत जाधव, भगवान पवार, उपाध्यक्ष अनंत पवार, डॉ. राजन मोहिते, सदस्य शांताराम मोहिते, सिद्धार्थ जाधव, सुधाकर जाधव, नित्रीमा जाधव, मिलिंद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतात शैक्षणिक कारकिर्दीतील अनुभव मांडत संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
प्रास्ताविक अनंत पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघाचे सल्लागार अजित बाईत यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अल्पेश सोळकर, प्रथमेश विचारे व संतोष चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर, दत्तप्रसाद पाटील, दादा नागवेकर, कृष्णा मालप आदी मान्यवर उपस्थित होते.

