(रत्नागिरी / वार्ताहर)
शिक्षक दिनाचे औचित्य साधून समाजातील भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा सन्मान टाटा AIA लाइफ इन्शुरन्स, रत्नागिरी शाखेच्या वतीने ‘गुरु सन्मान २०२६’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी शहर व परिसरातील विविध शाळांमधील ज्येष्ठ, गुणवंत शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. ज्ञान, कौशल्य, संस्कार आणि समर्पित सेवेतून अनेक पिढ्यांचे जीवन घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
टाटा AIA लाइफ इन्शुरन्स, रत्नागिरी शाखेचे शाखाप्रमुख श्री. समीर मुळे यांच्या संकल्पनेतून ‘गुरु सन्मान २०२६’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी रत्नागिरीतील विविध शाळांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये डॉ. स्वराली राजन शिंदे, सौ. श्रद्धा राजन बोडेकर, सौ. वृंदाली राजेंद्र गुरव, प्रा. मिलिंद भगवान कदम, प्रा. मनोज तानाजी जाधव, श्रीमती मंजिरी महेश डेरे, पंडित खीरु राठोड, प्रा. विक्रांत रावराणे, भगवान मोटे, अनिल शेट्ये,
राजेंद्र रांजणकर, प्रशांत मांडवकर यांच्यासह रत्नागिरीतील विविध शाळांमधील शिक्षकांचा समावेश होता.
निवड झालेल्या शिक्षकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षक म्हणून कार्य करताना आलेले अनुभव, विद्यार्थ्यांशी असलेले भावनिक नाते आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत शिक्षकाची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका याबाबत विचार मांडले.
समाज घडविणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गुरु सन्मान २०२६’ हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.


