( देवळे / प्रकाश चाळके )
संगमेश्वर तालुका शिवसेना युवासेना तालुकाप्रमुखपदी प्रसाद अपंडकर यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.
प्रसाद अपंडकर यांनी गेल्या पाच वर्षांत संगमेश्वर तालुक्यात युवासेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर पुन्हा तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या कार्याला मिळालेली ही पुनर्नियुक्ती म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावती असल्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार भैय्या सामंत यांनी यावेळी सांगितले.
पुनर्नियुक्तीनंतर प्रसाद अपंडकर यांनी पालकमंत्री उदय सामंत, आमदार भैय्या सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी, महाराष्ट्र राज्य युवासेना कोअर कमिटी सदस्य अपूर्वा सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके आणि ज्येष्ठ शिवसैनिक विलासभाई बेर्डे यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास अधिक चांगले काम करून सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्य युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास भरतशेठ गोगावले यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र नुकतेच प्रसाद अपंडकर यांना पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार भैय्या सामंत यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, ज्येष्ठ शिवसैनिक विलासभाई बेर्डे, लक्ष्मण कदम, विभागप्रमुख राजू शेठ कामेरकर, अंकुश सुर्वे, प्रणित बेटकर आणि शेखर सुर्वे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

