(रत्नागिरी / प्रकाश चाळके)
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या मध्य तालुका सरचिटणीसपदी अथर्व प्रशांत सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या रत्नागिरी नाचणे विभागात सक्रियपणे काम करत असताना त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अथर्व सावंत हे यापूर्वी नाचणे विभागात भाजपच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी झाले असून, संघटनात्मक कामातही त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मध्य तालुक्यात भाजयुमोची संघटनात्मक ताकद अधिक वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, रत्नागिरी दक्षिण भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राहुल पवार, मध्य भाजपयुमो तालुकाध्यक्ष साहिल साळवी आणि तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व सावंत काम करणार आहेत.
पक्षाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत मध्य तालुक्यात भाजयुमोची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त सरचिटणीस अथर्व सावंत यांनी व्यक्त केली.

