(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील चिखली बौद्धवाडीचे सुपुत्र श्री. निखिल अनिल मोहिते यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची विक्रीकर निरीक्षक (Sales Tax Inspector) तसेच सहायक निबंधक श्रेणी-१ (Sub Registrar, Grade-I) या दोन्ही पदांसाठी निवड झाली आहे.
निखिल मोहिते यांनी मेहनत, जिद्द, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे चिखली तसेच संगमेश्वर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ग्रामीण भागातील तरुणाने स्पर्धा परीक्षेत मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.
निखिल मोहिते यांच्या या उल्लेखनीय आणि अभिमानास्पद यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला मिळालेले हे यश अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे. निखिल मोहिते यांच्या पुढील शासकीय सेवेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

