(संगमेश्वर)
तालुक्यातील आंबवली गावचा सुपुत्र मुआज मकबूल कोंडकरी याची आगामी ऑल इंडियन टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली असून हा संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
मुआज याच्या सातत्यपूर्ण सराव, उत्कृष्ट खेळी आणि दमदार कामगिरीमुळे त्यांची निवड झाली. त्याच्या या यशाचे क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत स्थानिक ते राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये लौकिक मिळवलेल्या मुआजकडून आता राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रवासात आंबवली स्पोर्ट्स अँड वेल्फेअर असोसिएशनचा मोठा वाटा असून घरातूनही त्याला अखंड पाठबळ मिळाले. आई–वडिलांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच मुआजने यशाची शिखरे गाठण्यास सुरुवात केली. गावातील आरिफ शिरगावकर व खलील शिरगावकर यांचे मार्गदर्शन तसेच वरिष्ठ मंडळाचा पाठिंबा मिळाल्यामुळे मुआजचा आत्मविश्वास अधिकच वाढला.
त्याच्या या निवडीबद्दल माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाने शाळा, स्थानिक मंडळ, ग्रामस्थ, अधिकारी वर्ग तसेच नातेवाईकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
या निवडीबदल अभिजीत सप्रे, श्री. शिंदे, मुबारक कोंडकरी, नासिर कोंडकरी, खलील शिरगावकर, मेहबूब मालगुंडकर, जमातीचे अध्यक्ष मुबिन मालगुंडकर, मेहबूब शिरगावकर, शरीफ धामस्कर, सादिक आंबेडकर, कासम मनेर, युनूस कोंडकरी, आरिफ शिरगावकर, लांबे फकीर, सर्फराज कोंडकरी, नबील कोंडकरी यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी कौतुक केले.
संगमेश्वर तालुक्यातील आंबा व्यापारी व प्रसिद्ध उद्योजक मुश्ताक कापडी यांनीही या खेळाडूचे विशेष कौतुक केले. “अशा खेळाडूंमुळे तालुक्याचे व गावाचे नाव उज्ज्वल होत आहे. मुआजने आपली कौशल्य दाखवून प्रेरणादायी कामगिरी केली आहे,” अशा शब्दांत त्यांनी त्याचे अभिनंदन केले.

