(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर नावडी येथील निनावी देवी मंदिरात येथील निनावी देवी प्रासादिक मंडळाच्या वतीने साजरा होत असलेल्या नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला असून सोमवारी सकाळी निनावी देवीला रूपे लावून सजली आहे. तीचे देखणे रूप पाहण्यास गर्दी होऊ लागली आहे. तसेच पूजा आरती इत्यादी पारंपरिक पद्धतीने आरंभ करण्यात आलेला आहे. तसेच मंदिर परिसरात मुख्य रस्त्यापासून विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आलेली आहे.
सुमारे 150 वर्षापासून येथील सर्व बांधव, मित्रपरिवार पारंपरिक वातावरणात नवरात्रोत्सव साजरा करतात. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये सर्व धार्मिक सहभागी होतात. सन 1964 65 च्या काळात लेख महामारी असताना देखील येथील मानकर यांनी तसेच मंडळाने हा उत्सव साजरा केला होता. सद्याच्या काळात निनावे देवी मंदिराचा जिर्णोद्धार झाल्यानंतर आता देखील भक्ती भावात थाटामाटात नवरात्रोत्सव साजरा केला जातो
या उत्सवामध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर, गोवा आदी ठिकाणी स्थाईक झालेले बांधव, माहेरवाशिणी या ठिकाणी येऊन भक्तीभावाने सहभागी होत असल्याचे निनावी देवी प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष तथा मानकरी दत्ताराम किसन उर्फ बाबा सुर्वे यांनी सांगितले. भक्तीभावामध्ये साजरा होणारा हा उत्सव भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण करत असल्याचे मानकरी बावा सुर्वे सांगतात.

