(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक कार्यालयामार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयाचा खेळाडू पंकज पांडुरंग गोताड याने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.
या यशामुळे पंकज गोताडची २३ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पंकज हा मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही तो उल्लेखनीय कामगिरी करत आहे.
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पंकजने या स्पर्धेत यश संपादन केले. त्याच्या या कामगिरीबद्दल मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा दीप्ती मयेकर, कार्याध्यक्ष रोहित मयेकर, खजिनदार ऋषीकेश मयेकर, संचालक सुरेंद्र माचिवले व प्रकाश भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी त्याचे अभिनंदन केले.
राज्यस्तरीय स्पर्धेतही पंकजने उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह प्राचार्या आणि प्राध्यापकांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

