(रत्नागिरी / वार्ताहर)
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स भाग-२ अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी पार्वती रावल हिची प्लेक्सिमस आयएनसी कंपनीमध्ये कनिष्ठ मनुष्यबळ कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. शिक्षण घेत असतानाच कॉर्पोरेट क्षेत्रात व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात करण्याची संधी मिळाल्याने तिच्या या यशाचे विशेष कौतुक होत आहे.
कॉम्प्युटर सायन्ससारख्या आधुनिक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच विविध उद्योगक्षेत्रांतील करिअरच्या संधींची ओळख करून देण्यावर महाविद्यालयाचा भर आहे. त्याचाच परिणाम म्हणून पार्वती रावल हिने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
पार्वतीच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे आणि आय.टी.सी.एस. समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच तिच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

