(रत्नागिरी)
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलादुन्नबी म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. इस्लामी कालगणनेनुसार हा दिवस तिसऱ्या महिन्यातील १२ रबीउल अव्वल रोजी येतो आणि संपूर्ण मुस्लिम समाजात पवित्र दिवस म्हणून मानला जातो.
यावर्षी ईद-ए-मिलादनिमित्त रत्नागिरी शहरात ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता भव्य जुलूस रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली कोकणनगर येथून सुरुवात होऊन मारुती मंदिर, उद्यमनगर मार्गे पुन्हा कोकणनगर येथे समाप्त होईल.
तसेच, ४ सप्टेंबर रोजी रात्री १०:०० वाजता कोकणनगर येथील फैजाने अत्तार येथे ईद-ए-मिलादची भव्य मैफिल भरवण्यात येणार आहे.
मुस्लिम महिलांसाठी विशेष कार्यक्रम म्हणून ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता उद्यमनगर खारवी समाज हॉल येथे भव्य इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे. या इज्तिम्यात सर्व महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे.

