(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम परशराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय परिसरात ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत विविध वृक्षांचे रोपवाटप आणि वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांसह पालकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पर्यवेक्षक शाम महाकाळ, ज्येष्ठ शिक्षक अरुण कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पवार, क्रीडा शिक्षक संतोष सनगरे, किशोर नलवडे, हरित सेना विभाग प्रमुख राहुल यादव, संदीप कुराडे, परीक्षा विभाग प्रमुख केशव राठोड, वैभव खानोलकर, हेमराज बहिरम, अमित बोले, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष अर्जुन माचिवले, माता पालक संघाच्या अध्यक्षा माधवी संतोष गोताड, विजय मायंगडे, मानवी गोताड, मयुरी गोताड, अंकिता मायंगडे यांच्यासह पालक प्रतिनिधी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसह पालकांना रोपांचे वाटप
शाळेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील उर्फ बंधू मयेकर यांनी विशेष प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना आणि पालकांना विविध वृक्षांची रोपे वितरित करण्यात आली. यामध्ये नील, करंज, फणस, काजू, जांभूळ आदी विविध झाडांच्या रोपांचा समावेश होता.
‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेतून आई-वडिलांनी आपल्या मुलांसोबत आणि मुलांनी आपल्या पालकांसोबत एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या रोपांची नियमित देखभाल करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हरित सेना विभाग प्रमुख राहुल यादव, संदीप कुराडे, कर्मचारी भालचंद्र कांबळे तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

