( रत्नागिरी / वार्ताहर )
बसणी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल युवासेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. युवासेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या परीक्षेत बसणी जिल्हा परिषद मराठी शाळेचा १०० टक्के निकाल लागल्यामुळे युवासेनेचे स्थानिक प्रतिनिधी आराध्य महेश नेवरेकर यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वेदिका वैद्य तसेच शिक्षिका सौ. वर्षा घाग यांचे विशेष अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालक व शिक्षकांचा मोठा वाटा असतो. राज्यस्तरावर घेण्यात येणाऱ्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे ही खरोखरच अभिमानाची बाब असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कुमारी सानवी सचिन गावडे, कुमारी गौरी सचिन नेवरेकर, कु. वरद वैभव रावणंग, कु. आराध्य मंदार झगडे, कुमारी दुर्वा सुमित राणे, कु. शिवम अभिजित झगडे, कु. आर्यन विजय मोहिते, कुमारी सृष्टी संतोष चव्हाण आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ज्येष्ठ शिवसैनिक श्री. मोहन (दादा) धांगडे, उपविभाग प्रमुख श्री. अमित धांगडे, उपसरपंच श्री. किशोर नेवरेकर, शाखाप्रमुख श्री. महेश नेवरेकर, कार्यालय प्रमुख श्री. संतोष नेवरेकर, गटप्रमुख श्री. अमेय मांडवकर, श्री. वैभव रावणंग तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

