(रत्नागिरी / वार्ताहर)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत कोतवडे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, कोतवडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात हिमोग्लोबीन तपासणी, रक्तदाब, मधुमेह, एचबीए१सी तसेच नेत्र तपासणी करण्यात आली. शिबिराचा लाभ कोतवडे परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घेतला.
ग्रामीण भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच गोरगरीब नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन महागड्या तपासण्या करणे शक्य होत नाही. ही गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर हे शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती सरपंच श्री. संतोष बारगोडे यांनी दिली.
या प्रसंगी उपसरपंच श्री. स्वप्नील पड्याळ, ग्रामपंचायत अधिकारी श्री. देविदास इंगळे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष श्री. स्वप्नील मयेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. दिया कांबळे, विस्तार अधिकारी श्री. पी. एन. सुरवे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गौरी कांबळे, आरोग्य सेवक श्री. संकेत पंडिये, लॅब टेक्निशियन सौ. नेहा जाधव, नेत्र तपासणी अधिकारी श्री. विजय मारे तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. कोतवडे परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा आरोग्य शिबिरांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.

