( मंडणगड / वार्ताहर )
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट सभागृह, मंडणगड येथे भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर आणि भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ॲड. वैभव खेडेकर आणि जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, पक्षाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच आगामी काळातील पक्षाच्या कामकाजाबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
बैठकीला भाजपा रत्नागिरी जिल्हा महामंत्री तथा गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, अजय दळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, प्रसाद मांडवकर, भाजपा दापोली महिला मोर्चा तालुकाध्यक्षा जया साळवी, भाजपा दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, शशांक सिनकर, भाजपा सोशल मीडिया दापोली तालुका संयोजक धिरज पटेल, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले, भाजपा सोशल मीडिया खेड शहरप्रमुख सर्वेश पवार यांच्यासह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कामकाजाबाबत आपली मते मांडली. आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

