(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड यांच्या वतीने आरोग्य उपकेंद्र वरवडे अंतर्गत उंडी येथे सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.
शिबिरात एक्स-रे, ईसीजी, रक्त तपासणी, असंसर्गजन्य आजारांची (NCD) तपासणी, वजन व उंची मोजणी यांसह तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्यविषयक समुपदेशन आणि आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.
या शिबिराला रिळ-उंडीचे सरपंच राकेश महाडिक, उपसरपंच पूजा घावळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश डोके, आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर, नेत्र चिकित्सक उगवेकर, समुदाय आरोग्य अधिकारी अक्षता शिर्सेकर, पोलीस पाटील सान्वी घावळी यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य सेविका अर्चना आपकरे व दीपा गावडे, आरोग्य सेवक मंडले, सुरेश अंबुरे व संकेत कासेकर, अंगणवाडी सेविका अंजली पारकर, सीआरपी, मदतनीस चंदा विचारे तसेच आशा सेविका सपना पवार यांनी शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले.
शिबिरात एकूण ७२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच विविध आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंडच्या आरोग्य पथकाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी केले.

