(रत्नागिरी)
वाढदिवसाच्या कार्यक्रमात गेलेले ७५ वर्षीय वृद्ध खुर्चीत बेशुद्ध पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी मांडवी हायवेजवळ घडली. दीपक प्रकाश चव्हाण (५५, रा. अभ्युदय नगर, नाचणे रोड, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे.
दीपक चव्हाण हे मांडवी हायवेजवळ एका नातेवाईकाच्या वाढदिवसासाठी गेले होते. त्याठिकाणी व्यासपीठावरील खुर्चीत ते बसले असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले- जमलेल्या नातेवाईकांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते बसलेल्या खुर्चीतच बेशुद्ध पडले त्यानंतर त्यांना तातडीने शहरातीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.