(देवळे / प्रकाश चाळके)
वन विभाग, चिपळूण (रत्नागिरी) आणि शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, तालुका संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने “झाडे लावा, झाडे जगवा” या संकल्पनेतून आयोजित वृक्षलागवड व संवर्धन कार्यक्रम आज (शुक्रवारी, ३१ जुलै) रोजी संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील माध्यमिक विद्यालयात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन केले. तसेच वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन वन विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनी या परिसरात ४०० हून अधिक गवे असल्याचे सांगत त्यांचा योग्य बंदोबस्त करण्याबाबत विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती दिली.
विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी दाभोळे हायस्कूल परिसरात लावण्यात आलेली सुमारे १५० झाडे विद्यार्थ्यांना दत्तक देऊन त्यांची नियमित देखभाल करण्याचा उपक्रम राबविण्याची सूचना केली. तसेच त्या पुन्हा शाळेला भेट देऊन स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करतील आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक संदर्भ पुस्तके उपलब्ध करून देतील, असेही त्यांनी जाहीर केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच रक्तचंदनाची रोपे भेट देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार किरण (भैय्या) सामंत, विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड, वन अधिकारी विक्रम गुरव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, दाभोळेचे सरपंच राजेश रेवाळे, दाभोळे हायस्कूलचे अध्यक्ष संजय कांबळे, शेतकरी लाकूड व्यापारी संघटना तालुका संगमेश्वरचे अध्यक्ष किरण जाधव, क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, ज्येष्ठ शिवसैनिक विलास बेर्डे, उपविभाग प्रमुख राजेश कामेरकर, जया माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य बापूशेठ शेटये, सुशील भायजे, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद अपंडकर, संजय गांधी योजना समिती सदस्य मंगेश दळवी, रजनी चिंगळे, अंकुश सुर्वे, ओंकार कोलते, संजय बावदाने, सुभाष चव्हाण, रवींद्र सावंत, बापू शिंदे, प्रमिला चव्हाण, केतन दुधाणे, पप्पूशेठ गांधी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष चव्हाण यांनी केले.

