(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
मुंबईमध्ये काम करण्याऱ्या कोकणातील मंडप कामगारांचा ऐन गणपती सणाच्या तोंडावर मंडप ठेकेदार आणि कामगार यांच्यामध्ये काही मागण्यावरून ठिणगी पडली. या कामगारांनी ही बाब मनसेचे जितेंद्र चव्हाण यांच्या कानावर गेली. जितेंद्र चव्हाण यांनी मुंबईमध्ये दाखल होत या कामगारांना एकत्र करून प्रशासन ठेकेदार आणि कामगार यांच्यामध्ये योग्य समनव्य साधत न्याय मिळवून दिला. कोकणातील या कामगारांनी जितेंद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
मुंबईमध्ये कोकणातील असंख्य कामगार मंडप कामासाठी जातात. नुकतेच एन गणपती सणाच्या तोंडावर ठेकेदार आणि कामगार यांच्यामध्ये कामाचा मोबदला आणि इतर मागण्यावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद भोईवाडा पोलीसस्थानकापर्यंत पोहचला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत कडवई येथील मुंबईस्थित मनसेचे कार्यकर्ते संजय धामनाक, शांताराम राक्षे व योगेश कुवळेकर यांनी ही बाब जितेंद्र चव्हाण यांच्या कानावर घातली.
जितेंद्र चव्हाण यांनी तात्काळ मुंबईकडे धाव घेत सर्व कामगारांची सभा घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या सभेला साडेसातशे कामगार उपस्थित होते. सभेनंतर सर्व कामगारांसह भोईवाडा पोलीस स्थानकावर धडक मारत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम यांची भेट घेतली. यावेळी सचिन कदम यांनी यशस्वी मध्यस्थी करत कामगार व ठेकेदार यांच्याशी समनव्य साधत यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले.
तसेच मुंबई नाका कामगार व मुकादम तसेच मुंबई डकोरेटर्स असोसिएशन मालक संघटना यांच्यामध्ये मनसेचे नेते श्री. संजय नाईक यांनी सकारत्मक चर्चा होऊन पगारवाढ व इतर समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यात आला. यावेळी चव्हाण यांचे निकटवर्ती संजय धामणाक,शेखर नलावडे, नंदकुमार फ़डकले, परेश धामनाक, दिनेश चिले, मुकादम कृष्णा बेंडल, संजय सावंत, राम डिके, संतोष डिके, संजय पंडियार, विनोद बाटले, मंगेश सुर्वे, रूपा मादगे, शांताराम धूमक,श्रीपत वणगे, दिनेश घाणेकर आदी उपस्थित होते.
यानंतर मुंबई डेकोरेटर्स असोशियशनच्या वतीने मुंबई मध्ये ठिकठिकाणी बॅनर लावून जितेंद्र चव्हाण, संजय नाईक, सुनील मोरे , आमदार कालिदास कोलंबकर, अजय चौधरी, महेश सावंत तसेच पोलीस प्रशासन यांचे आभार मानण्यात आले आहेत. मंडप कामगारांनीही अडचणीच्या वेळेत कामगारांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल जितेंद्र चव्हाण आणि मान्यवरांचे आभार मानले.
(फोटो – कामगारांशी चर्चा करताना जितेंद्र चव्हाण आणि मान्यवर)