(दापोली / वार्ताहर)
कोकणातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे शिक्षणतज्ज्ञ संदीप राजपुरे यांना दिल्ली येथे आयोजित भव्य समारंभात पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) प्रदान करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना मानपत्र, पदक आणि शाल देऊन गौरविण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही महानगरांप्रमाणे दर्जेदार, आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे, या ध्येयाने संदीप राजपुरे यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांनी कोकणातील हजारो विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची नवी दालने खुली केली आहेत.
शालेय, उच्च, आरोग्य, व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली, देवरुख, रत्नागिरी, चिपळूण आणि पालगड येथे विविध शैक्षणिक संस्था यशस्वीपणे कार्यरत आहेत. यामध्ये श्री रामराजे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, श्री रामराजे कॉलेज, श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल (CBSE), मराठा मंदिर CBSE इंग्लिश मीडियम स्कूल, आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल, पूज्य साने गुरुजी कला व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय, देवरुख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, मा. मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट, रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग तसेच चिपळूण येथील श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग या संस्थांचा समावेश आहे.
या संस्थांमार्फत B.Sc. Nursing, P.B. B.Sc. Nursing, G.N.M., A.N.M., B.P.Th., D.Pharmacy, B.Pharmacy, B.Sc. Hospitality Studies, B.Com. (Accounting & Finance), B.A.M.M.C., B.A., B.Com., BCA, B.Sc. IT, BMS आणि D.Ed. यांसारखे विविध पदवी, व्यावसायिक आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीमुळे या संस्थांनी अल्पावधीतच विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला आहे.
शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाने संदीप राजपुरे यांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

