(गुहागर / रत्नागिरी)
पाय घसरून पडल्याने जखमी झालेल्या गुहागर तालुक्यातील पालकोट-त्रिशूळ साखरी येथील ७५ वर्षीय वृद्धाचा कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शांताराम बाबू वेदरे असे मृत वृद्धाचे नाव आहे. या आकस्मिक मृत्यूची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शांताराम वेदरे हे २९ जुलै २०२६ रोजी पाय घसरून पडल्याने जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.१७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती दूरध्वनीद्वारे मिळाल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यासंदर्भातील कागदपत्रे कराड शहर पोलीस ठाण्याकडून १९ ऑक्टोबर रोजी पाठविण्यात आली. ही कागदपत्रे २६ ऑक्टोबर रोजी गुहागर पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली.


