(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी आणि नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ जुलैदरम्यान देवरुख येथील ओमेगा गार्डन हॉलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्युरोगी व पूमसे स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील अधिकृत गणराज क्लबच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण ११ पदकांची कमाई केली.
स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. गणराज क्लबच्या २० खेळाडूंनी विविध गटांत आपले कौशल्य सिद्ध केले. विशेष म्हणजे, सब-ज्युनिअर गटात बरखा संदे हिने २०२६ वर्षाचा ‘बेस्ट फायटर’ किताब पटकावत क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
सुवर्णपदक विजेते
विधी पूजा विवेकुमार दुबे, बरखा तरन्नूम सर्फराज संदे, गौरी सारिका अभिजीत विलणकर, त्रिशा साक्षी सचिन मयेकर आणि केशर कनिष्क कुणाल शेरे यांनी सुवर्णपदके पटकावली.
रौप्यपदक विजेते
अहाना आशका आशिष रसाळ, तीर्था आराध्या प्रशांत मकवाना आणि केशर कनिष्क कुणाल शेरे यांनी रौप्यपदके मिळवली.
कांस्यपदक विजेते
दुर्वा मानसी मंदार हातिसकर आणि युबना तरन्नूम सर्फराज संदे यांनी कांस्यपदकांची कमाई केली.
याशिवाय नीरज आराध्या प्रशांत मकवाना, ध्रुवी सृष्टी साष्टांग मयेकर, विहान नीता मिलिंद साप्ते, आद्य आशका आशिष रसाळ, स्पर्श रीना किरण रेडीज आणि शार्वी ऋतिका महेश महाजन यांनीही स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत क्लबचे प्रतिनिधित्व केले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश रावकर, सचिव लक्ष्मण के. आणि खजिनदार शशांक घडशी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या यशामागे मुख्य प्रशिक्षक सौ. आराध्या प्रशांत मकवाना यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
गणराज क्लबच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेविका पूजा पोवार, क्लब अध्यक्षा ॲड. पूजा प्रसाद शेट्ये, उपाध्यक्षा साक्षी मयेकर, सचिव रंजना मोंडुला, सदस्य परेश मोंडुला, स्नेहा मोरे, शलाका जावकर तसेच क्रीडाप्रेमी, पालक आणि नागरिकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

