(दापोली / वार्ताहर)
रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने तसेच संगमेश्वर तालुका तायक्वॉंदो अकॅडमी आणि नगरपंचायत देवरुख तायक्वॉंदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत देवरुख येथील ओमेगा गार्डन हॉलमध्ये जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत दापोलीच्या सिद्धाई तायक्वॉंदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीचा खेळाडू कु. प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. या यशाच्या जोरावर त्याची आगामी राज्यस्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्रद्युम्नला दापोली तालुक्याच्या महिला प्रमुख प्रशिक्षिका सौ. प्रिती दाभोळे तसेच दापोली तालुका प्रमुख प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय तायक्वॉंदो खेळाडू श्री. प्रथमेश दाभोळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रद्युम्न आणि त्याच्या प्रशिक्षकांचे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष जया साळवी, शहराध्यक्ष वैष्णवी वेल्हाळ, तालुका सरचिटणीस संदीप केळकर, शहर सरचिटणीस मयुरेश्वर वेल्हाळ, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस धीरज पटेल, ज्येष्ठ कार्यकर्ते अजय साळवी, तायक्वॉंदो राज्य संघटनेचे खजिनदार व जिल्हाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा सचिव लक्ष्मणराव कररा, प्रदीप दाभोळे, विष्णू गोडसे, तसेच सिद्धाई तायक्वॉंदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीचे उपाध्यक्ष प्रदीप राजपूत, सहसचिव महेश्वर जाधव, कोषाध्यक्षा श्रद्धा दाभोळे, सदस्य शैलेश मिसाळ, मंगेश गोडसे आणि पालकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

