(दापोली/ रत्नागिरी)
किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या २२ वर्षीय तरुणाचा मुंबई येथील के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हेमराज कुमार दिनेश मेहता (वय २२, रा. काळकाईकोंड, नांगरबुडी, ता. दापोली) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमराज मेहता यांना किडनीचा त्रास जाणवू लागल्याने प्रथम उपचारासाठी दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबई येथील के.ई.एम. रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ८८/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.


