(देवळे /प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावचे सुपुत्र डॉ. गुरुप्रसाद राजेंद्र मावळणकर यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्री (सेंद्रिय रसायनशास्त्र) या विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून देवळे गाव, संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.
डॉ. गुरुप्रसाद हे श्री. राजेंद्र गंगाराम मावळणकर आणि सौ. स्नेहा राजेंद्र मावळणकर यांचे सुपुत्र आहेत. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण संशोधनाच्या बळावर ही मानाची शैक्षणिक पदवी संपादन केली.
त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे देवळे गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात करिअर घडविण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.
डॉ. गुरुप्रसाद मावळणकर यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या भावी संशोधन कार्यासाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी आणि उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

