( पुणे )
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत 9,253 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले असून, विशेष म्हणजे परीक्षा झाल्यानंतर अवघ्या 17 दिवसांत निकाल जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वीही राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा निकाल केवळ 21 दिवसांत जाहीर करून आयोगाने जलद निकाल प्रक्रियेची परंपरा कायम ठेवली होती.
14 जूनला परीक्षा, 17 दिवसांत निकाल
एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 14 जून 2026 रोजी गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जामध्ये दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक पात्रता तपासून हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना निर्धारित मुदतीत ऑनलाइन अर्ज भरून परीक्षा शुल्क जमा करणे अनिवार्य असेल. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस बसण्याची संधी मिळणार नाही.
अंतिम पात्रता तपासणीनंतरच प्रवेश
आयोगाने स्पष्ट केले आहे की, अर्जातील माहिती, कागदपत्रे आणि पात्रतेची अंतिम पडताळणी केल्यानंतरच उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी अंतिम प्रवेश दिला जाईल. तपासणीत अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते. तसेच हा निकाल आरक्षण आणि समांतर आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
निकाल कुठे पाहता येईल?
मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची बैठक क्रमांक, नावांची यादी आणि कट-ऑफ गुण (Cut-off Marks) आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळ: https://mpsc.gov.in
जिल्हानिहाय पात्र उमेदवारांची संख्या
एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये:
- पुणे – 2,857 (सर्वाधिक)
- कोल्हापूर – 671
- सातारा – 518
- नाशिक – 497
- छत्रपती संभाजीनगर – 479
- अहिल्यानगर – 459
- सांगली – 433
- सोलापूर – 320
- नवी मुंबई – 239
- लातूर – 238
- नांदेड – 213
- अमरावती – 210
- ठाणे – 207
- मुंबई मध्य – 204
- नागपूर – 177
- जळगाव – 151
- मुंबई पश्चिम – 147
- धाराशिव – 143
- धुळे – 117
- बीड – 112
- अकोला – 91
- चंद्रपूर – 90
- बुलढाणा – 80
- वाशिम – 76
- रायगड – 31
- भंडारा – 56
- गडचिरोली – 42
- गोंदिया – 25
- हिंगोली – 23
- जालना – 50
- सिंधुदुर्ग – 31
- नंदूरबार -39
- परभणी -62
- रत्नागिरी – 40
- वर्धा – 28
- यवतमाळ – 57
मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना
- ऑनलाइन अर्ज वेळेत भरणे बंधनकारक.
- विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरावे.
- पूर्व परीक्षेच्या अर्जातील माहितीच अंतिम ग्राह्य धरली जाईल.
- पात्रता पडताळणीनंतरच मुख्य परीक्षेचा प्रवेश निश्चित होईल.

