(खेड / वार्ताहर)
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, खेड यांच्या वतीने समाजाच्या आरोग्यसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या खेड शहरातील डॉक्टरांचा विशेष सन्मान करण्यात आला. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या हस्ते डॉक्टरांचा सत्कार करून त्यांच्या आरोग्यसेवेप्रती असलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
यावेळी स्माईल स्पेस मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचे डॉ. वेद मिलिंद तलाठी, डॉ. विरेंद्र चिखले आणि डॉ. ज्ञानेश्वर मरकड यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर हे समाजाचे खरे आरोग्यरक्षक असून, त्यांच्या ज्ञान, समर्पण आणि सेवाभावामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळते, अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमाला खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अजय शेठ बिरवटकर, रोहन विचारे, महेंद्र शिरगावकर, परेश चिखले, रिद्धी अविनाश दळवी, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश तसेच ओवैस चौगुले यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

