(खेड / वार्ताहर)
भारतीय जनता पार्टी, खेड यांच्या वतीने २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर ‘आणीबाणी काळा दिवस’ संवाद कार्यक्रमाचे आयोजन आय.सी.एस. कॉलेज, खोंडे-खेड येथे करण्यात आले. या कार्यक्रमात भारतीय लोकशाहीवरील आणीबाणीच्या परिणामांचा आढावा घेत संविधानिक मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कर्मवीर पद्मश्री दादासाहेब इदाते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आणीबाणीच्या काळातील घटनांचा उल्लेख केला. लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व, संविधानिक संस्थांची भूमिका आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण याबाबत त्यांनी सविस्तर विचार मांडले.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, आय.सी.एस. कॉलेजचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीमभाई सहीबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, आय.सी.एस. कॉलेजचे विभागप्रमुख सचिन भोसले, अनिता आवटी मॅडम, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्षा प्रीती चिखले, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह स्वराज गांधी, ओवेस चौगुले, अनिकेत पवार, प्रसाद मांडवकर, प्रदीप भोसले, डॉ. भालेराव, केळकर सर, सागर सर आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील आणीबाणीच्या कालखंडाची माहिती देण्यात आली तसेच लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.

