( राजापूर / तुषार पाचलकर )
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत युवासेनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या “गाव तेथे युवासेना” या अभियानाची राजापूर तालुक्यातून उत्साहात सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत तळवडे गावामध्ये युवासेनेची पहिली शाखा सुरू करण्यात आली असून, प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी दक्षिण रत्नागिरीत विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना कोकण विभाग सचिव विकास गोगावले, युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अपूर्वा सामंत तसेच जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संघटनात्मक उपक्रम राबविले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राजापूर येथे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यात युवकांना संघटित करण्याबरोबरच गावागावांत शाखा विस्ताराचे नियोजन करण्यात आले होते.
युवासेना तालुकाप्रमुख सुनील गुरव यांच्या पुढाकारातून तळवडे येथे पहिल्या शाखेची स्थापना करण्यात आली. शुक्रवारी ज्येष्ठ शिवसैनिक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाखा फलकाचे अनावरण करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कुळेकर, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाली मोरे, अपेक्षा मासये, पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, समीक्षा वापीलकर, युवासेना तालुकाप्रमुख सुनील गुरव, युवासेना सचिव महेश नकाशे, तालुका समन्वयक सुरेश ऐनारकर, युवती सेना तालुकाप्रमुख प्रेरणा पेडणेकर, उपतालुकाप्रमुख देवेश तळेकर, तालुका संघटक गौरव स्वरूप, संदीप बारस्कर, अक्षय मोरे, विभागप्रमुख युवराज मोरे, श्रद्धा जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत गुरव, उपविभागप्रमुख राहुल गोसावी, फिरोज फारस, मंथन जाधव, युवा शाखाप्रमुख सुरज गुरव, सचिन भुवड, निलेश मोरे, अभिराज वाडेकर, अशपाक प्रभुलकर, शाखाप्रमुख संदीप गुरव, सुमित गुरव, भाई अडसूळ, अजिवलीचे सरपंच राणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तळवडे येथील शाखा स्थापनेमुळे “गाव तेथे युवासेना” या अभियानाला राजापूर तालुक्यातून प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, आगामी काळात तालुक्यातील विविध गावांमध्ये अशाच शाखा स्थापन करण्याचा संकल्प युवासेनेने व्यक्त केला आहे.

