(गणपतीपुळे / वैभव पवार)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गणपतीपुळे आणि वरवडे ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय सदस्य संख्या आणि आरक्षण सोडत अखेर जाहीर झाली आहे. या सोडतीमुळे दोन्ही गावांतील राजकीय हालचालींना वेग आला असून कुठे आनंदाचे तर कुठे चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंचपद ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी खुले झाले आहे, तर वरवडे ग्रामपंचायतीचे सरपंचपद ‘सर्वसाधारण स्त्री’ साठी आरक्षित झाले आहे.
दोन्ही ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय अधिकृत आरक्षण खालीलप्रमाणे आहे:
१) ग्रामपंचायत वरवडे: प्रभागनिहाय आरक्षण
ग्रामपंचायतीत एकूण ४ प्रभाग असून एकूण ११ सदस्य संख्या आहे.
प्रभाग क्रमांक १ (सदस्य संख्या: ३)
१. नामाप्र स्त्री
२. सर्वसाधारण स्त्री
३. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २ (सदस्य संख्या: ३)
१. सर्वसाधारण स्त्री
२. सर्वसाधारण स्त्री
३. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३ (सदस्य संख्या: ३)
१. अ.जा. स्त्री
२. नामाप्र
३. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४ (सदस्य संख्या: २)
१. सर्वसाधारण स्त्री
२. सर्वसाधारण
२) ग्रामपंचायत गणपतीपुळे: प्रभागनिहाय आरक्षण
एकूण ३ प्रभाग असून एकूण ७ सदस्य संख्या आहे.
प्रभाग क्रमांक १ (सदस्य संख्या: २)
१. सर्वसाधारण स्त्री
२. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २ (सदस्य संख्या: ३)
१. सर्वसाधारण स्त्री
२. सर्वसाधारण स्त्री
३. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३ (सदस्य संख्या: २)
१. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
२. सर्वसाधारण
राजकीय गणिते बदलणार!
या आरक्षण सोडतीमुळे दोन्ही गावांमधील अनेक इच्छुकांची गणिते बदलली आहेत. गणपतीपुळे येथे सरपंचपद सर्वसाधारण झाल्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर वरवडे येथे सरपंचपद सर्वसाधारण स्त्री राखीव झाल्यामुळे महिला राजकारण्यांना मोठी संधी चालून आली आहे. आता आगामी काळात निवडणुकीचा रंग कसा बदलतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

