(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले येथील रहिवासी विश्रांती वासुदेव पोकडे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने डोर्ले परिसरासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. डोर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अमृत पोकडे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम गुरुवार, दिनांक ४ जून २०२६ रोजी डोर्ले येथील त्यांच्या राहत्या घरी संपन्न होणार आहे.

