(गावखडी / वार्ताहर)
गणेशगुळे (ता. रत्नागिरी) येथील श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या पावन प्रसंगी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.
बुधवार, २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता विधिवत गणेशपूजन, अभिषेक व मंत्रपुष्पांजली पार पडली. सकाळी ८ वाजता आरती झाली. सकाळी ९ वाजता गुरुकृपा मॉकटेल अँड मोअर LLP यांच्यावतीने सरबत वाटप करण्यात आले. त्यानंतर ११ ते १२ या वेळेत ह.भ.क. उल्हास लाड (कसोप) यांचे जन्मोत्सव कीर्तन झाले.
दुपारी १२ वाजता श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२ ते ३ या वेळेत गुरुकृपा मॉकटेल अँड मोअर LLP, श्री हृदय आत्माराम लाड व रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्या सौजन्याने महाप्रसाद वाटप करण्यात आले. कु. सार्थक प्रज्योत गुळेकर यांच्याकडून लाडू, तर श्री अजय यशवंत नागवेकर यांच्याकडून पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
दुपारी १ वाजता बुवा श्री दामोदर लोकरे (मुंबई) यांचे भजन झाले. दुपारी ३ वाजता काडसिद्धेवर प्रासादिक भजन मंडळ, गणेशगुळे यांच्या वतीने बुवा संदेश तोडणकर यांनी भजन सादर केले. सायंकाळी ६ वाजता आरती पार पडली.
रात्री ९ वाजता देणगीदार व नाटककारांचे आभार प्रदर्शन तसेच क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. रात्री १० वाजता समाजमनाला भिडणारे दोन अंकी शोकांतिका नाटक ‘वास्तव’ सादर करण्यात आले. या नाटकाचे लेखक प्र. ल. मयेकर असून दिग्दर्शन प्रकाश विष्णू लाड यांनी केले. लाड ऐक्यवर्धक नाट्य मंडळ, मुंबई यांनी हे नाटक सादर केले.
हा संपूर्ण उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळेचे अध्यक्ष प्रसाद सुनिल तोडणकर, उपाध्यक्ष प्रज्योत मधुकर गुळेकर, सचिव प्रथमेश सुयकांत रांगणकर, उपसचिव ओंकार विष्णू वजरेकर, खजिनदार जितेंद्र भागवत तोडणकर, सहखजिनदार शैलेश सहदेव जोशी, कार्याध्यक्ष विक्रम शांताराम गुरव, उपकार्याध्यक्ष संदेश सुधाकर मावळकर तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भाविक भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.
छायाचित्रे:
1.गणेशगुळे येथील श्री क्षेत्र स्वयंभू गणेशाचे दर्शन
2.माघी गणेशोत्सवानिमित्त पालखी मिरवणुकीत खांदा देताना मंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुनिल तोडणकर व अन्य मान्यवर
3.माघी गणेशोत्सवानिमित्त गणेशगुळे येथे भाविकांची मोठी गर्दी
(छायाचित्र: दिनेश पेटकर, गावखडी)

