(चिपळूण)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूणमधील पाग परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात अॅक्टिव्हवरील दोन महिला जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्र महाराज संस्थेची मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. १७ मे रोजी सायंकाळी सुमारे ४.२० वाजण्याच्या सुमारास चिपळूण येथील देसाई सुपर बाजारसमोर हा अपघात घडला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एमएच ०४ जीयू २४८८ क्रमांकाची युवान कारने अॅक्टिव्हला जोरदार धडक दिली.
या अपघातात मनस्वी मंदार भोजने (वय ३४, रा. पाग) आणि मानसी भोजने या जखमी झाल्या. स्थानिकांच्या मदतीने आणि तातडीच्या प्रतिसादामुळे दोघींना उपचारासाठी कुटीर रुग्णालय, कामथे येथे दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच चिपळूण येथे सेवेत असलेली जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराज संस्थेची मोफत ॲम्बुलन्स घटनास्थळी पोहोचली. ॲम्बुलन्स चालक सत्यम पवार यांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले.
या अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक मंदावली होती. पुढील तपास सुरू आहे.

