(चिपळूण)
सेवन स्टार मित्र मंडळाच्या आयोजनाने आणि श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण यांच्या पुरस्कराने होणाऱ्या श्री कालभैरव चषक २०२६ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या क्रीडांगण उभारणीच्या कामाचा शुभारंभ रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आला. कै. बापू बाबाजी सांगावकर मैदान, श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान प्रांगण येथे श्रीफळ वाढवून या कामास प्रारंभ करण्यात आला.
या शुभारंभ प्रसंगी देवस्थानचे पुजारी श्री. कमलाकर आरमारे, चिपळूण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री. समीरदादा जाधव, श्री लॅबोरेटरीजचे डॉ. सुनील भागवत, विद्यमान नगरसेवक श्री. अजयजी भालेकर, श्री. उदय देसाई तसेच लक्ष्मी कॅफेचे संचालक श्री. विलास साळवी उपस्थित होते.
यावेळी श्री देव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री. समीर शेट्ये, महाजन विश्वस्त श्री. पंकज कोळवणकर, श्री. दीपक यादव, श्री. प्रसाद आलेकर तसेच सेवन स्टार मित्र मंडळाचे सदस्य आणि नामांकित वकील श्री. विश्वजीत यादव, श्रीनिवास रेड्डीज, श्रीराज रेड्डीज, अमित कांबळी, संजय घोरपडे, दिनेश राऊत, सौरभ लकेश्री, परेश जानवलकर, देवेश शेलार, मयूर कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत १२ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून स्पर्धा सलग तीन दिवस चालणार आहे. अंतिम सामना रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी याच मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या ठिकाणी प्रेक्षकांसाठी सुसज्ज आणि सुरक्षित गॅलरी व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व कबड्डीप्रेमींनी या थरारक स्पर्धेचा आस्वाद घ्यावा आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री देव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट व सेवन स्टार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

