( मुंबई )
उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन Konkan Railway Corporation Limited कडून मडगाव-पनवेल-मडगाव दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाडीमुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११०६ मडगाव-पनवेल साप्ताहिक विशेष ही गाडी रविवार, १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे.
तर गाडी क्रमांक ०११०५ पनवेल-मडगाव साप्ताहिक विशेष ही गाडी सोमवार, १८ मे २०२६ रोजी सकाळी ५.४५ वाजता पनवेल येथून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६.१० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचणार आहे.
या स्थानकांवर थांबा
ही विशेष गाडी करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबा घेणार आहे.
गाडीची रचना
या विशेष गाडीत एकूण २३ डबे असणार आहेत. त्यात :
३ टियर एसी – ३ डबे
स्लीपर – ११ डबे
जनरल – ७ डबे
एसएलआर/डी – २ डबे
असा समावेश आहे.
आरक्षणाला १४ मेपासून सुरुवात
गाडी क्रमांक ०११०६ साठीचे आरक्षण १४ मे २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण केंद्रे, पीआरएस प्रणाली तसेच IRCTC अधिकृत संकेतस्थळ वर उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वे चौकशी संकेतस्थळ http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

