(राजापूर / वार्ताहर)
सामाजिक न्याय विभागासह विविध संस्थांचा संयुक्त उपक्रम; तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध तपासण्या आणि मोफत औषध वितरण
राजापूर : ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, रत्नागिरी यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल लांजा, श्री स्वामी समर्थ नेत्र रुग्णालय लांजा आणि श्री देवी गुंडीबाई चॅरिटेबल ट्रस्ट, राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
रविवार, दि. १० मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत गुंडीबाई पटांगण, गांवकरवाडी, मोरोशी (ता. राजापूर) येथे हे शिबिर पार पडणार आहे.
शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार असून रक्तदाब, रक्तातील साखर, वजन, स्त्रीरोग, हाडांची तपासणी, ईसीजी, दमा, कान-नाक-घसा, डोळे तपासणी तसेच आहारविषयक मार्गदर्शन आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. याशिवाय रुग्णांना मोफत औषधांचे वितरणही करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रत्नागिरी श्री दीपक घाटे, डॉ. सुहास खानविलकर, डॉ. सुहास देसाई, अनिता आत्माराम नारकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी श्री शशिकांत चव्हाण मोबाईल ९६०४०२०६३८ यांच्याशी संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे.

