(मुंबई)
मुंबई विद्यापीठ ने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी पदवी (UG) प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. 6 मे 2026 पासून प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होणार असून 21 मे 2026 दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, 4 वर्षांचा ऑनर्स/ऑनर्स विथ रिसर्च आणि 5 वर्षांचे इंटिग्रेटेड प्रोग्राम्स (मल्टिपल एंट्री-एक्झिट) यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या (BA, BSc, BCom आदी) प्रथम वर्षासाठी ही नोंदणी आवश्यक असेल.
महत्त्वाच्या तारखा (UG Admission Schedule 2026):
- ऑनलाइन नोंदणी व अर्ज: 6 मे ते 21 मे 2026 (दुपारी 1 वाजेपर्यंत)
- पहिली मेरिट लिस्ट: 26 मे 2026 (सकाळी 11 वाजता)
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व फी भरणे: 27 ते 29 मे
- दुसरी मेरिट लिस्ट: 30 मे (संध्याकाळी 7 वाजता)
- फी भरणे: 1 ते 3 जून
- तिसरी मेरिट लिस्ट: 4 जून
- फी भरणे: 5 ते 9 जून
- वर्ग/ओरिएंटेशन सुरू: 13 जून 2026
कोणते अभ्यासक्रम उपलब्ध?
प्रथम वर्षासाठी BA, BSc, BCom, BAMMC, BMS, BAF, BBI, BFM, IT, Computer Science, Data Science, Biotechnology, Aviation, Hospitality, तसेच विविध इंटिग्रेटेड आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. B.Voc, म्युझिक, परफॉर्मिंग आर्ट्स, फॉरेन्सिक सायन्स, मेरिटाईम, नॉटिकल सायन्स यांसारखे विशेष अभ्यासक्रमही उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या सूचना:
- प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे
- महाविद्यालयांनुसार अर्ज प्रक्रिया (ऑनलाइन/ऑफलाइन) पूर्ण करावी लागेल
- आरक्षण नियम व पात्रतेनुसार प्रवेश दिला जाईल
- AICTE अंतर्गत BMS प्रवेश CET निकालानंतर होणार
विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, सर्व प्रवेश प्रक्रिया विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबवली जाईल. विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

