(रत्नागिरी)
सेंट थॉमस स्कूल रत्नागिरी येथे झालेल्या अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल स्पर्धेमध्ये सेंट थॉमसच्या 16 वर्षाखालील दोन्ही संघाच्या मुलींनी विजेतेपद व उपविजेतेपद मिळवून यशाची परंपरा कायम राखली. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते विजेत्या संघाचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी विद्यार्थ्याच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले.
अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल स्पर्धेमध्ये 16 वर्षाखालील मुलीचे एकूण 6 संघाची निवड करण्यात आली होती. यामध्ये सेंट थॉमस स्कूल मधील 2 संघ खेळत होते. या दोन्ही संघानी विशेष कामगिरी करत विजेते व उपविजेते पद मिळवून सेंट थॉमसचे स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
क्रीडाशिक्षक अजित धावडे स्वप्नाली पवार, मार्गदर्शक प्रवीण आंबेरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल सेंट थॉमस स्कूलचे व्यवस्थापक फादर थॉमस, मुख्याध्यापक फादर जॉर्ज, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

