(पाचल / तुषार पाचलकर)
पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यारमंदिर कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथील इयत्ता बारावी (वाणिज्य शाखा)चा विद्यार्थी कुमार वैभव कृष्णा पाटील याने ८९.६७ टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाबद्दल पाचल परिसरासह संपूर्ण तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवर्गाचे आणि संस्थाचालकांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
या महाविद्यालयाचा एकूण निकाल ९६.४३ टक्के लागला आहे.
शाखानिहाय निकाल
🔹 कला शाखा – निकाल: ९३.०२%
प्रथम: चंदना सुभाष वाकडे – ७७.८३%
द्वितीय: किरण बाळकृष्ण गुरव – ७६.५०%
तृतीय: जान्हवी गंगाराम कांबळे – ७४.६७%
🔹 वाणिज्य शाखा – निकाल: ९८.०७%
प्रथम: वैभव कृष्णा पाटील – ८९.६७%
द्वितीय: पल्लवी आत्माराम साळवी – ८२.८३%
तृतीय: सुजल विश्वनाथ राणे – ८१.१७%
🔹 विज्ञान शाखा – निकाल: ९६.४२%
प्रथम: मयुरेश मंगेश पांचाळ – ७३.३३%
द्वितीय: सोशनल राजेश झाले – ६८.५०%
तृतीय: वैष्णवी विकास शेट्ये – ६४.५०%
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

