(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होत असल्याचे चित्र नाटे परिसरात पाहायला मिळाले. ठाकरेवाडी, पडवणे, बाणेवाडी, थळेश्री मिराशीवाडी आदी भागांतील शेकडो ग्रामस्थांनी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात उबाठा गटाच्या ग्रामपंचायत सदस्या ज्योती मयेकर व प्रांजल लकळे तसेच उबाठा शाखाप्रमुख चंद्रकांत मिराशी यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख दीपक नागले, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, जिल्हा परिषद सदस्या कोमल नवाळे, पंचायत समिती सदस्या जान्हवी गावकर, चंद्रकांत पड्यार, रवींद्र नागरेकर, गिरीश करगुटकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर आमदार भैय्या सामंत यांनी नाटे परिसरातील नागरिकांशी संवाद साधत गावातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांबाबत माहिती घेतली. नागरिकांनी सादर केलेली निवेदने स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. काही प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या ग्रामस्थांनी मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. मतदारसंघाच्या विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला विभागप्रमुख मनोज आडविलकर, उपविभागप्रमुख प्रेमानंद कलव, रमेशशेठ लांजेकर, संतोष चव्हाण, शाखाप्रमुख विद्याधर कांबळी, अनिल ठाकरे, मंगेश पारकर, अल्केश पवार, संदेश पाथरे, रोशन डुगीलकर, सचिन कोठारकर, रुपेश मिराशी, बंड्या चव्हाण, दीपक पावसकर, अजय बंदरकर, महिला उपतालुकाप्रमुख प्राजक्ता पांचाळ यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या पक्षप्रवेश सोहळ्यात परेश लकळे, गणेश पारकर, अक्षय मयेकर, सिद्धात शेट्ये, विकी शेट्ये, दिवा पेडणेकर, राजेश ठाकरे, प्रसाद आरेकर, मनीष मसुरकर, नितेश ठाकरे, प्रणय कलव, श्रीकृष्ण पेडणेकर, प्रवीण होलम, रवी मयेकर, नितीन करंगुटकर, दीपाली मयेकर, नेहा करंगुटकर, शीतल कलव, सुगंध ठाकरे, तसेच आंबोळगडचे माजी उपसरपंच शत्रुघ्न वाडेकर, ज्येष्ठ समाजसेवक विश्वासभाई करंगुटकर, अनिल नार्वेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे नाटे परिसरातील शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत झाल्याची भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

