(खेड)
खोपी प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील वरेकर यांचा सेवापूर्ती समारंभ नुकताच मिर्ले नंबर एक शाळेत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र जाधव होते. व्यासपीठावर बीट मुख्याध्यापक संजय हिंगावार, सेवानिवृत्त शिक्षक अजित भोसले, शिरगाव नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक दत्ताराम चव्हाण, बिजघर नंबर एक शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, तसेच सुनील वरेकर यांच्या पत्नी सौ. स्नेहल वरेकर आणि कन्या ॲडव्होकेट गायत्री वरेकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान संजय जाधव सर आणि संदीप फागे सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कदम यांनी केले. समारंभ यशस्वी करण्यासाठी माधवी भोसले, विजयकुमार भिसे, शैलेश पराडकर, शशिकांत भुवड, संदीप घाणेकर, तृप्ती तुकाराम काताळे, अंकिता भोसले, सरला मावळी आदींनी विशेष प्रयत्न केले.

