(खेड)
शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाने बेरोजगारीला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. फहिम फारुक देशमुख (२५, रा. नांदगावकर चाळ, शिवाजीनगर, ता. खेड) असे तरुणाचे नाव आहे.
काही कामधंदा नसल्याने फहिम देशमुख बेरोजगारच होता. या बेरोजगारीमुळे तो कंटाळला होता. कंटाळलेल्या फहिमने शनिवारी सायंकाळी ४ ते ५:३० वाजण्याच्या दरम्यान घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी खेड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.